रामभाऊ आवारे, प्रतिनिधी

निफाड : तालुक्यातील खेरवाडी येथे निलांजनम बहुउद्देशीय ट्रस्ट खेरवाडी व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नाथ माऊली सदन खेरवाडी तालुका निफाड येथे करण्यात आले होते. तुळशी आय हॉस्पिटल नाशिक व निलांजनम ट्रस्टचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. साडेदहाला शिबिर सुरू झाले व अडीच वाजता संपले. यावेळी ११२ व्यक्तींनी

शिबिरात नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्यातील १३ इसमांना त्यांनी ऑपरेशन करण्यास सांगितलेले आहे इतर सर्वांना जो लाभ मिळाला त्याबद्दल आनंद वाटला. शिबिरा करिता श्री अशोक कापसे सर, श्री केदु बेंडकुळे, श्री सोमा भाई संगमनेरे यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व इतर ट्रस्टी यांनी देखील सहभाग घेऊन शिबिराचा उत्साह वाढवला व आजचे शिबिर यशस्वी रित्या संपन्न

केले. कमी खर्चात झालेले हे आपले शिबिर असून शिबिराचा पूर्ण खर्च २९०० आलेला आहे त्यात २४०० रुपये २ बॅनर व इतर खर्च ५०० रुपये असा खर्च आलेला आहे. बॅनर चा खर्च ट्रस्ट मधील जमा रकमेतून खर्च केलेला आहे. फराळ सोमभाई यांनी दिला अध्यक्ष यांनी जेवणाची रक्कम दिली. लगड भाऊसाहेब बाबाजी व ह भ प श्री बाळासाहेब महाराज यांनी शेवटपर्यंत उपस्थिती दिली.

या शिबिरासाठी पंचक्रोशीतील नागरिक, ट्रस्टचे विश्वस्त ,सभासद यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नीलांजनम बहुउद्देशीय ट्रस्टचे अध्यक्ष ॲड प्रकाशराव पाटील ,उपाध्यक्ष अशोकराव कापसे, खजिनदार बाळासाहेब महाराज संगमनेरे, विश्वस्त रामकृष्ण तात्याबा लगड, निवृत्ती संगमनेरे, रमेश बाजीराव संगमनेरे ,ॲड शिवाजी आवारे ,भास्करराव बुरके ,सजन जाधव, भाऊसाहेब पाटील, रमेश परशराम संगमनेरे, बाबाजी संगमनेरे ,सोमनाथ संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे ,अनिल आवारे, विकास आवारे ,सुभाष संगमनेरे, केदु बेंडकुळे,आशाताई पाटील ,ज्योतीताई आहेर ,सारिका आवारे ,श्रद्धा संगमनेरे ,उपसरपंच कैलास संगमनेरे, शिवाजी आवारे आदींनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *