पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी नवीन कॅनॉल रामदरा पुलाचे लोकार्पण व सुमारे ३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. जिल्हा नियोजन निधी व ग्रामनिधीच्या माध्यमातून या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून, यामुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

या कार्यक्रमास मनिषा ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नागेश अंकुशराव काळभोर, संचालक प्रशांत काळभोर, सिताराम लांडगे, प्रताप शं. बोरकर, आण्णासाहेब ग. काळभोर, विठ्ठल रामचंद्र काळभोर, ज्ञानेश्वर ना. काळभोर, राजेंद्र य. काळभोर, हेमंत गायकवाड, बाळासाहेब ज. काळभोर, इंद्रभूज नारायण काळभोर, युवराज काळभोर, वंदना प्रशांत काळभोर, हेमंत गायकवाड, हेमा मिलिंद काळभोर, मनोज काळभोर, पांडुरंग केसकर, गुरुदेव काळभोर, संजय लक्ष्मण काळभोर, अमोल कोळपे, रमेश भोसले, संतोष भोसले, राजाभाऊ पिंगळे, चिमाजी केसकर, दत्ता केसकर, राजाराम बापू काळभोर, राहुल काळभोर, गणेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमध्ये रस्ते, निचरा व्यवस्था, पुलाचे मजबुतीकरण तसेच ग्रामविकासाशी संबंधित अन्य सोयीसुविधांचा समावेश आहे. नवीन कॅनॉल रामदरा पुलामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून, परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी एस. एन. गवारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.