पुणे : नूतन माध्यमिक विद्यालय, वडकी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना व प्रतिमांचे पूजन करून झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्त माहितीपर सादरीकरण केले. श्राव्य खरात, कार्तिक भोसले, समर्थ घोरपडे व शिवाजली आंबेकर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या कार्य व विचारांवर प्रभावी माहिती मांडली.

कार्यक्रमात संजय गणपत पाटील यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका रेखा प्रल्हाद आबनावे यांनी विद्यार्थ्यांनी आदर्श जीवनमूल्ये अंगीकारावीत, असे आवाहन केले. प्रास्ताविक शीतल प्रविण लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवाजी नारायण होले यांनी केले. आभार निर्मला नागेश मुदीगोंडा यांनी मानले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता मोडक उपस्थित होत्या. तसेच स्वरूप वर्धनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेला ‘आनंदमठ’ हे पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. एकूणच कार्यक्रम उत्साहवर्धक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.