पुणे : उरुळी कांचन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनंत रामचंद्र कांचन यांची अध्यक्षपदी, तर लिलावती तुकाराम चौधरी यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.
सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष जयसिंग बाबुराव कांचन व उपाध्यक्ष संजय रामचंद्र गायकवाड यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून एस. एन. देसाई यांनी काम पाहिले, तर सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव संतोष चौधरी यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

निवडणुकीच्या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, माजी सरपंच अमित बाबा कांचन, जयप्रकाश बेदरे, तुकाराम चौधरी, ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी तसेच संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत कांचन यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक, शिस्तबद्ध व विकासाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेत ग्रामीण विकासाला चालना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.