पुणे : “मायबाप जनतेने एकदा काम करण्याची संधी दिली, तर केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष विकास करून दाखवू,” असा ठाम आणि आक्रमक विश्वास जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर–आव्हाळवाडी) येथील उमेदवार सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक रणधुमाळीत उतरलेल्या काकडे यांच्या प्रचाराला गावोगाव उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ‘काम करणारे नेतृत्व’ अशी त्यांची ओळख वेगाने बळावत आहे.

थेऊर–आव्हाळवाडी परिसरातील पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरी आरोग्यसेवा, शिक्षणातील अडचणी, स्वच्छतेचा अभाव आणि महिलांचे प्रलंबित प्रश्न – या सगळ्यांवर त्यांनी थेट बोट ठेवले आहे. “फक्त फलकबाजी आणि दिखावू आश्वासनांचा काळ संपला आहे. आता जनतेला उत्तर देणारा आणि जमिनीवर उतरून काम करणारा प्रतिनिधी हवा आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.
प्रचारादरम्यान सौ. काकडे घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. समस्या ऐकून घेणे, त्यावर तात्काळ उपाययोजना सुचवणे आणि दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडणे, ही त्यांची प्रचाराची खास शैली ठरत आहे. “जनतेच्या पैशाचा एक-एक रुपया विकासासाठीच वापरला जाईल. पारदर्शकता आणि जबाबदारी हा माझ्या कारभाराचा कणा असेल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महिलांसाठी सक्षम योजना, तरुणांसाठी संधी, शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांसाठी मूलभूत सोयी – हा त्यांचा स्पष्ट अजेंडा आहे. त्यामुळेच थेऊर–आव्हाळवाडी गटात ‘नुसते बोलणारे नाही तर काम करणारे नेतृत्व हवे’ अशी भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याची हवा असून, त्या लढतीत सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे या निर्णायक ठरणार आहेत.