पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन गटात राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. आज पक्षाचे जिल्हा संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांच्या हस्ते अधिकृत उमेदवारी फॉर्म (AB) देत उरुळी कांचन जिल्हा परिषद गटासाठी अनिल रामू कदम (SC) यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले. या

अनिल रामू कदम हे तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक न्याय, विकास आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “ही उमेदवारी म्हणजे सामान्य जनतेच्या प्रश्नांना विधानसभेपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना जिल्हा संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उरुळी कांचन गटात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अनिल कदम हे जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”
उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. आगामी निवडणूक ही केवळ निवडणूक नसून जनतेच्या हक्कांसाठीची लढाई असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उरुळी कांचन गटात आता खरी राजकीय लढत रंगणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक भूमिकेत उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.