पुणे : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे दुर्मीळ व ऐतिहासिक नाण्यांचे प्रभावी प्रदर्शन उत्साहात पार पडले. शिवकालीन तसेच विविध संस्थानकालीन नाण्यांसह जगभरातील तब्बल शंभर देशांची नाणी आणि नोटांचा मनोवेधक संग्रह विद्यार्थ्यांसाठी मांडण्यात आला होता.

मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी सांगितले की, या प्रदर्शनाला विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतिहासाचा अभ्यास आणि प्राचीन चलनव्यवस्थेबद्दलची ओळख विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनामध्ये विशेषतः शिवछत्रपतींच्या दुर्मीळ चलनांसह विविध संस्थानांचे, साम्राज्यांचे आणि प्राचीन कालखंडातील नाण्यांचा समावेश होता. शिवकालीन चलनांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे नाणे संग्राहक विशाल जगताप यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हे अनोखे प्रदर्शन यशस्वी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *