ग्रामस्थांचा उत्स्फूर्त विश्वास — “सातव म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व”
पुणे : पंचायत समिती केसनंद–वाडेबोल्हाई गणाचे तरुण, सक्रिय आणि लोकप्रिय इच्छुक उमेदवार कुशालनाना गोरख (आबा) सातव यांच्या सांगवी सांडस ग्रामदौऱ्यास ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावात प्रवेश करताच ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची पायघड्या, पारंपरिक औक्षण आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सातव यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
ग्रामदौऱ्याच्या निमित्ताने तब्बल २०० वाहनांचा भव्य ताफा गावात दाखल झाला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी ‘कुशाल नानालाच मतदान’ अशी घोषणा देत उमेदवारीला उत्साहपूर्ण प्रतिसाद दर्शविला. एका नागरिकाने तर भगवान विष्णूची शपथ घेऊन सातव यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा केल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले.
तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमध्ये सातव यांच्या कामाची प्रामाणिकता, सर्वसमावेशक दृष्टी आणि विकासासाठीची कटिबद्धता स्पष्ट दिसून आली. “हे नवीन, सक्षम आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
दरम्यान, ग्रामदौऱ्यातील सभेत एका ग्रामस्थाने कुशाल सातव यांच्यावर रचलेले खास गीत सादर करत वातावरण रंगतदार केले.
आपल्या भाषणात कुशाल सातव म्हणाले,
“कुशाल नाना सातव म्हणजे मी एकटा नाही. माझ्यासोबत काम करणारे सर्वच कुशल सातव आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मी पदासाठी नव्हे, तर जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने निवडणूक रिंगणात उतरलो आहे. या भागाच्या प्राधान्याने विकासासाठी मी कटिबद्ध असून ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरेन.”
या ग्रामदौऱ्यास परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षणीय उपस्थिती लावली.
