पुणे: मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत सौ. कोमल गणेश कांबळे यांचा वाढदिवस उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मूकबधिर शाळेमध्ये सामाजिक भान जपत उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ केक कापण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांशी संवाद, आपुलकी आणि सहवेदनेतून हा वाढदिवस साजरा झाल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. त्यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षण, विकास व पुनर्वसनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष सुनील अंकुश तुपे, ह. भ. प. महाराज प्रशांत शिंदे, मेजर दिलीप घाडगे, उद्योजक अभिजीत धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सचिन जाधव, सुमित तलरेजा, रवी चव्हाण, ऋतिक तुपे, रमेश कोळी, यश मोडक, पियुष बुराडे, दीपक इंगळे, विवेक इंगळे, सिद्धांत आढागळे, सुरज बुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला प्रतिनिधींमध्ये जयश्री कांबळे, माधवी कांबळे, प्रीती कांबळे, पूजा आढाव, आरती लोंढे यांच्यासह अनेक महिलांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मूकबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौ. कोमल कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत समाजातील वंचित घटकांसाठी कायम कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
हा वाढदिवस कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा व प्रेरणादायी ठरला असून, समाजाने अशा उपक्रमांतून संवेदनशीलता जपावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
