पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उरुळी कांचन पांढरस्थळ येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल रामू कदम यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पी.टी. (शारीरिक शिक्षण) ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षणाला महत्त्व असून, त्या दृष्टीने हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानुभव अध्यक्ष महंत गोपाळ व्यास कपाटे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका कांचन, सुनिल तुपे (भाजप उपाध्यक्ष), चंद्रकांत खलसे, दिलीप गाडेकर, अमोल भोसले, प्रतिक्षा कांचन, दत्तात्रय होले (बागायतदार), रेश्मा कांचन, राणी कांचन, कोमल कांबळे, दीपक खलसे, सागर खलसे, आप्पासाहेब वाघमोडे, प्रताप आप्पा कांचन, प्रतीक्षा अनिल कदम, सचिन सदाशिव लोखंडे, नवनाथ काळूराम जगताप तसेच पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली खामकर तसेच उपशिक्षिका बागवान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
श्री. अनिल कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आरोग्य आणि क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी काम करत राहणार आहे.”
मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम व खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.
