पुणे: लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल येथे दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी ‘करडी पाथ डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रितेश यांची उपस्थिती लाभली. शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद कोतवाल याही यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात करडीच्या आकर्षक गीताने करण्यात आली. करडी अस्वलाच्या वेशात सजलेल्या रुद्राज याने गाणे सादर करत कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. ‘ करडी डे’ निमित्त फोकस सेशन्स, म्युझिक पाथ, विविध मनोरंजक उपक्रम, माईमिंग तसेच नाट्य सादरीकरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.

इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.

अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण हवेली तालुक्यात प्रथमच लोणी येथील एंजल हाय स्कूल (स्टेट बोर्ड) मध्ये आयोजित करण्यात आला असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
‘करडी डे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता व सर्जनशीलता वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या समन्वयक लिंडा गार्डनर मिस, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *