पुणे : कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व, निष्ठा आणि माणुसकी या पंचगुणांच्या संगमावर उभे असलेले गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून उरुळी कांचन भैरवनाथ सेवा उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रताप मारुती कांचन हे आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे सक्षमपणे नेत आहेत. सामाजिक जाणीव ठेवून सातत्याने कार्यरत असलेले युवा नेतृत्व आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन म्हणाले.
उरुळी कांचन येथील पांढरस्थळ परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रताप मारुती कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महादेव कांचन बोलत होते.
यावेळी पांढरस्थळ व तुपे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १०० स्कूल बॅग आणि ८०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन असून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदत करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, आबासाहेब चव्हाण, सचिन कांचन, सागर कांचन, शरद खेडेकर, दत्तात्रय कांचन, स्वप्नील कांचन, गणेश कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली खामकर, जैबुन बागवान, जयदीप कांचन, चंद्रकांत खलसे, बाळासाहेब कांचन, संभाजी कांचन, विलास लोंढे, मारुती ज्ञानोबा कांचन, रामभाऊ तुपे, पोपट तुपे, विकास तुपे, देविदास तळेकर, संजय कांचन, शिवाजी कांचन, बाळासो कांचन, योगेश सातपुते, सुवर्णा कांचन तसेच शिवतेज तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पांढरस्थळ वस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल तुपे यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करण्याची प्रेरणा प्रताप कांचन यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. आभार आबासाहेब चव्हाण यांनी मानले. सदर उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असून युवा नेतृत्वासाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरत आहे.
