पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. सुनिता सुरेंद्र लोखंडे या व्यक्तिमत्त्वाने आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षणाने दहावी असलेल्या सुनिता लोखंडे या पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार असून त्या श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ट्रस्ट, उरुळी कांचन यांच्या ट्रस्ट मेंबर आहेत. तसेच त्या समस्त चर्मकार समाज महिला मंडळ, उरुळी कांचनच्या महिला प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. दरवर्षी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सेवा व मदत, चर्मकार समाजात गुरु रविदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन ही त्यांची प्रमुख कार्ये आहेत. याशिवाय उरुळी कांचन भैरवनाथ कमिटीमध्ये सहभाग, काकड आरती व विविध सप्ताहांतील उपस्थिती, ग्रामस्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिरांमधील सहभाग त्यांच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवतो.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी MCED अंतर्गत मिरकॉन शिबिराचे आयोजन, तसेच पंचायत राज खेळ व क्रीडा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांनी यापूर्वी १९९९ साली पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली असून २००७ साली ग्रामपंचायत निवडणुकीतही अपक्ष उमेदवार म्हणून सहभाग घेतला होता.

त्यांचे पती श्री. सुरेंद्र सदाशिव लोखंडे हे चर्मकार महासंघ, हवेलीचे माजी खजिनदार असून श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ट्रस्ट, उरुळी कांचन पंचक्रोशीचे सल्लागार आहेत. हॉटेल व्यवसाय व पान शॉप हा कुटुंबाचा व्यवसाय असून सामाजिक कार्याची परंपरा लोखंडे कुटुंबाने जपली आहे.
सामाजिक प्रश्नांची जाण, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण कार्यशैलीमुळे सौ. सुनिता लोखंडे यांचे नाव उरुळी कांचन परिसरात आदराने घेतले जाते.