पुणे : मालेगाव आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे (मालेगाव) या सामाजिक संस्थेच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मालेगाव नगरीत लवकरच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान २०२६ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा भव्य व दिव्य स्वरूपात पार पडावा, यासाठी शिवछत्रपती पुरस्कार सोहळा समितीची कार्यकारिणी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेंद्र राऊत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील निवडक, होतकरू व कार्यतत्पर व्यक्तींचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रम आखीव-रेखीव, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडावा, या उद्देशाने तयारी युद्धपातळीवर सुरू असून लवकरच आयोजन समितीचे पदाधिकारी व निवडक पुरस्कारार्थी यांच्यात विचारविनिमय करून पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव, ता. निफाड) यांनी दिली.

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा आयोजन समिती पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष :
राजेंद्र राऊत पाटील (मालेगाव)
उपाध्यक्ष :
राजेंद्र तुकाराम पवार (मालेगाव), आशाताई बच्छाव (मालेगाव)
स्वागताध्यक्ष कविता बाविस्कर (नाशिक)
प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे (निफाड) समिती सदस्य प्रमोद पवार (मालेगाव), स्वप्निल देशमुख (बुलढाणा), प्रथमेश गायकवाड (ठाणे), पी. एन. देशमुख (अमरावती), सुरज गुंडमवार (गडचिरोली), विजय पवार (मुंबई), अभिनेते समाधान बिथरे (छत्रपती संभाजीनगर), सूर्यकांत भोर (पुणे), कारभारी गव्हाणे (अहिल्यानगर), सतीश लाहुळकर (अकोला), नरेश पाटील (पालघर), नरेंद्र पाटील (जळगाव), हेमंत जगताप (नंदुरबार), दिलीप चव्हाण (नाशिक), ज्ञानेश्वर निकम (सोलापूर), दिलीप बोंडे (जालना), मनोज बिरादार (नांदेड), आनंद खजांची (चंद्रपूर), मुजाहिद मोमीन (रायगड), फैय्याज मोमीन (भिवंडी), संदीप पाटील (धुळे) आदींचा समावेश आहे.

ही माहिती मुख्य आयोजक राजेंद्र राऊत पाटील (मालेगाव) व प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे (वनसगाव, ता. निफाड) यांनी संयुक्तपणे दिली.