पुणे : अलीकडे विविध वयोगटांतील स्पर्धकांसाठी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा आगळावेगळा वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम चिंचवड येथील एलप्रो मॉल येथे उत्साहात पार पडला. कशिश सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्वप्नील गोगावले एंटरटेनमेंट आणि आई फाउंडेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कुमारी / सौभाग्यवती / पुरुष आणि बालगट अशा विविध गटांत ही स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश थोरवे उपस्थित होते. यावेळी डॉ. अर्चना माळी, स्वप्नील गोगावले, डॉ. अजितसिंह पाटील, राज रणदिवे, अर्चना माघाडे, निलाक्षी जाधव, केतकी शिरबावीकर, स्मिता मधुकर, डॉ. स्मिता बारवकर, सई वढावकर, तसेच पुण्याचे ‘पॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे योगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कशिश प्रॉडक्शन्सचे ब्रँड दूत ओम जगदाळे यांनीही रॅम्पऐवजी फेरी चाल करून उपस्थितांची दाद मिळवली.
वेशभूषा स्पर्धेविषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, “सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी या महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर जनजागृती करण्यात येते.
या उपक्रमांतर्गत स्वच्छता नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. आजपर्यंत काश्मीर खोऱ्यासह पुणे व सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात गरजू महिलांना स्वच्छता नॅपकिन्सचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही त्याच संदेशाचा प्रसार केला जात आहे.”

स्वप्नील गोगावले म्हणाले, “मी अनेक वेशभूषा स्पर्धा पाहिल्या आहेत; मात्र महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या विषयाभोवती गुंफलेला हा कार्यक्रम वेगळाच अनुभव देणारा ठरला. या स्पर्धेतील विजेत्यांना आमच्या आगामी गीत-संग्रहातील गाण्यात संधी देण्यात येणार आहे.”
स्पर्धकांचा मेकअप ‘वेलनेस वर्ल्ड ब्युटी स्कूल’तर्फे करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण सपना भावे, प्रियंका मिसाळ, अभिनेत्री पूजा वाघ, प्रीती कोचर, प्रिया पाटील आणि माधवी बोकील यांनी केले. सूत्रसंचालन रेडिओ निवेदक बंड्या यांनी केले.
विजेते : क्रितिका सिंह, पूनम मौर्य, आशिमा खन्ना, अक्षय मालुंजकर, आयांश गणपते, मिशिता शेट्टी, सानवी फाळके.
उपविजेते : डिंपल डोगरा, जस्वीन सिंघ, उत्कर्ष गोरे, बलजीत, सार्थकी केदारी, सिया पाटील, हिमाली सावे, वैष्णवी कापले, विराज मिसुरकर, प्रेम शहा, प्रिया दिलोड, कविता पवार, स्नेहा पोतदार, टीना नेगी.