पुणे: पूर्व पुण्यातील खराडी, वडगावशेरीसह आसपासच्या परिसरात समाजकारण आणि जनसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेले सुरेंद्र पठारे हे आज कर्तृत्ववान, कार्यशील आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. निष्काम, निःस्वार्थ सेवाभाव आणि लोकांच्या दैनंदिन अडचणींबाबत असलेली आत्मीयता यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला आहे.
समाजसेवेबरोबरच सुरेंद्र पठारे हे एक कुशल आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणूनही परिचित आहेत. रिअल इस्टेट, तंत्रज्ञान तसेच कृषी-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वी उद्योग उभारले आहेत. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी आणि पुणे शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांनी उद्योग क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या कुटुंबात वाढ झाल्यामुळे ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’ ही मूल्ये त्यांच्यात लहानपणापासूनच रुजली. त्यांचे वडील बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्रात अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधी म्हणून केलेली निस्वार्थ जनसेवा हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरली आहे. हा वारसा पुढे नेत सुरेंद्र पठारे यांनी जनहित आणि जनसेवेची परंपरा अधिक सक्षमपणे सुरू ठेवली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचा सामाजिक कार्यात प्रभावी वापर
पुण्यातील नामांकित COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) येथून यंत्र अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या सुरेंद्र पठारे यांनी अभियांत्रिकी शिक्षणातून मिळालेला विश्लेषणात्मक आणि उपाययोजनात्मक दृष्टिकोन सामाजिक कार्यात प्रभावीपणे वापरला आहे. नागरी समस्या, पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सोयी-सुविधांशी संबंधित प्रश्नांवर शाश्वत व व्यवहार्य उपाय सुचवण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
रक्तदान महाशिबिरातून समाजासाठी आदर्श उपक्रम
कोरोनासारख्या भयावह काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, या उद्देशाने सुरेंद्र पठारे यांच्या पुढाकारातून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात येते.
२०२१ साली १६४४, २०२२ साली ३४५३, २०२३ साली ३५९३ आणि मागील सर्व विक्रम मोडीत काढत २०२४ साली तब्बल ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. रक्तदात्यांचा उत्साह आणि समाजाप्रती असलेली कर्तव्यभावना समाधान देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही दरवर्षी २६ जानेवारी रोजी असेच रक्तदान महाशिबिर आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे.
‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला मोठा प्रतिसाद
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेला बळ देत सुरेंद्र पठारे यांच्या माध्यमातून ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरे घेऊन ५४ हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यात आला.
आधार कार्ड शिबिरे आणि २४x७ टोल फ्री सेवा
नागरिकांना आधार कार्डसंबंधी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सातत्याने आधार कार्ड शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळू लागली आहे.
यासोबतच नागरिकांच्या विविध तक्रारी व गरजांसाठी १८०० २५८ ६०९० हा २४x७ टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून रुग्णवाहिका, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कचरा व्यवस्थापन, आधार कार्ड यांसारख्या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिक घेत आहेत.
क्रीडा संस्कृतीसाठी ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया’
सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया’ या उपक्रमाअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, स्विमिंग, स्केटिंग यांसह बुद्धिबळ व कॅरमसारख्या खेळांचा समावेश असतो.
सर्व वयोगटांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धांमध्ये ८ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.
यासोबतच वडगावशेरी परिसरातील खेळाडूंसाठी धनुर्विद्या, महिला क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल यांसारखे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात असून, स्थानिक खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.
पूर्व पुण्याच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
खराडी, वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, लोहगाव, कल्याणीनगर परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरेंद्र पठारे हे स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत सातत्याने कार्यरत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात.
एकूणच निष्काम सेवा, अभ्यासू दृष्टिकोन आणि प्रभावी कार्यपद्धतीच्या जोरावर सुरेंद्र पठारे हे पूर्व पुण्यातील नागरिकांसाठी विश्वासार्ह, कार्यशील आणि होतकरू युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.