पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपी अमोल भीमराव साळवे (वय ३८, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यास विविध कलमांखाली शिक्षा ठोठावण्यात आली.

पौड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक २८२/२०२२ तसेच विशेष केस क्रमांक ७४८/२०२२ या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात झाली.

न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(फ)(ज)(एल) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड, तर कलम ५०६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कलम ३ सह ४ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड, कलम ५(ज)(२) सह ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ५००० रुपये दंड, कलम ७ सह ८ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड, तसेच कलम ९(क)(एल) सह १० अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी (पौड पोलिस स्टेशन, सध्या रत्नागिरी) यांनी केला.सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता अनिलकुमार वर्मा यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
सदर खटल्यात पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी हे प्रभारी अधिकारी होते. न्यायालयीन कामकाजात एचसी ५८९ अल्ताफ हवालदार व पीसी १४८७ अकबर शेख (समन्स बजावणी) यांनी सहकार्य केले.
पुणे सेशन कोर्टातील पैरवी अंमलदार म्हणून पीएसआय विद्याधर निचित, तर जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पीआय संतोष घोळवे ( टी एम सी, पुणे ग्रामीण) यांनी खटल्याच्या कामकाजात सहभाग घेतला.