प्रतिनिधी, रामभाऊ आवारे

निफाड : श्रीक्षेत्र सावरगाव तालुका निफाड येथे ४१ वर्षाची अखंड परंपरा जोपासत समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ सावरगाव व सप्ताह कमिटी यांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे श्री संत जनार्दन स्वामी श्री संत लालबाबा महाराज आळंदीकर वैं बाळा बाबा ढगे ह भ प वासुदेव नंदगिरी जी महाराज, वैं हनुमंत महाराज खैरनार वैं रघुनाथ महाराज कुशारे ,वैं मधुकर महाराज जाधव जोपुळ, वैं काशिनाथ महाराज कुशारे सावरगाव यांच्या कृपाशीर्वादाने व किर्तन केसरी ह भ प संजय नाना धोंडगे महाराज देवळा यांच्या कुशल मार्गदर्शनाने ह भ प दत्तप्रसाद महाराज खडक माळेगाव व समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या शुभ प्रेरणेने विना व कलश पूजन होऊन सप्ताह शनिवार २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे अशी माहिती समस्त ग्रामस्थ सावरगाव श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ सावरगाव यांनी दिली आहे.

दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे–
श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ पाहुणे भजनी मंडळ रोज पहाटे ५ ते ७ काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व्यासपीठ नेतृत्व ह भ प दत्तप्रसाद महाराज मालेगाव हरिपाठ ज्ञानेश्वरी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सायंकाळी ५ ते ६ हरिकीर्तन रोज रात्री ८ ते १० या वेळेत होणार आहे. सप्ताह काळात रोज ३ ते ५ या वेळेत श्रीमद् भागवत कथाकार ह भ प अशोक महाराज रघुनाथ कुशारे यांची कथा होणार आहे. विणेकरी म्हणून राजाराम महाराज कुशारे, चोपदार ह भ प दत्तू महाराज पगार ह भ प विलास महाराज कुशारे हभप अरुण नेटारे आणि स्वागत उत्सुक समस्त ग्रामस्थ श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ सावरगाव

कीर्तनाची रूपरेषा पुढील प्रमाणे–
शनिवार २१ फेब्रुवारी सायंकाळी ८ ते १० हभप आसारामजी महाराज बडे आळंदी देवाची यांचे कीर्तन, रविवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते १० युवराज काका महाराज देशमुख आळंदी देवाची यांची कीर्तन, सोमवार २३ फेब्रुवारी रोजी उच्च विद्याविभूषित ह भ प जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली यांचे कीर्तन, मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी भागवताचार्य श्रद्धेय ह भ प भगीरथ महाराज काळे कोपरगाव यांचे कीर्तन, बुधवार २५ फेब्रुवारी रोजी खानदेश रत्न पोपट महाराज पाटील कासार खेडेकर यांचे कीर्तन ,गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी वारकरी भूषण महंत ह भ प एकनाथ महाराज चतर शास्त्री यांचे कीर्तन, शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ४ तालुका वारकरी महामंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

किर्तन केसरी ह भ प संजय नाना धोंडगे यांचे कीर्तन शनिवार रोजी सकाळी ९ ते ११ वारकरी भूषण ह भ प मनोहर महाराज घोडे (सर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .या कार्यक्रमासाठी गायनाचार्य म्हणून अक्षय महाराज वाघ ,ह भ प शिवराम महाराज बोराडे, त्याचबरोबर पखवाज वादक म्हणून हभप ओंकार महाराज रायते ,ओंकार महाराज भालेराव, व कृष्णा महाराज चौधरी यांचे सहकार्य लाभणार असून सदर कार्यक्रमासाठी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष ह भ प सुवर्णामाई जमधडे वडगाव बेल्हे येवला व टाळकरी कीर्तनात साथ करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *