पुणे : हडपसर परिसरात कौटुंबिक वादातून शिवीगाळ व मारहाणीची घटना घडल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शोभना विशाल भोसले (वय ३०, रा. शिंदे वस्ती, साईबाबा मंदिराजवळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादात संशयित विशाल शिवाजी भोसले (रा. हडपसर) व पूजा विजय भोसले (रा. ललगुण, ता. खटाव, जि. सातारा) यांनी तक्रारदारास शिवीगाळ करत दमदाटी केली व हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१ व ३५२ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा (NCR क्रमांक 0126/2026) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारदाराला पुढील कायदेशीर दाद न्यायालयामार्फत घेण्याचा सल्ला दिला असून, आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *