पुणे : सोरतापवाडी (ता. हवेली)
येथील रॉयल ग्रुप फ्रेंड सर्कलच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त गावातील १० ते १६ वयोगटातील तब्बल ५०० मुला-मुलींसाठी मोफत एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘चलो शिवनेरी’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना किल्ले शिवनेरी (छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान) तसेच श्री क्षेत्र ओझर विघ्नहर गणपती मंदिर येथे दर्शन घडविण्यात येणार आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज (सनी) पोपट राव चौधरी (ग्रामपंचायत सदस्य) यांनी सांगितले की, आजची भावी पिढी समृद्ध व सुसंस्कृत व्हावी तसेच शिवरायांचे विचार आत्मसात करावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोबाईल गेम्स, रील्स व इंटरनेटच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना इतिहासाशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मूर्ती पूजन व अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सनी चौधरी यांनी यापूर्वीही मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सन २०२४ मध्ये भव्य चित्रकला स्पर्धा, २०२५ मध्ये भव्य गट नृत्य स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
‘चलो शिवनेरी’ सहलीसाठी प्रस्थान रविवार, दि. १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ग्रामपंचायत, सोरतापवाडी येथून होणार आहे.
हा उपक्रम गावातील पालक व नागरिकांकडून कौतुकास्पद मानला जात असून, बालकांमध्ये इतिहासप्रेम व संस्कार रुजविण्यासाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
नोंदणी व माहितीसाठी संपर्क :
९५०३५००४२१ | ८४३२०५३५३५ | ८४१२०६२२८४ | ९०४९९९९४३३