प्रतिनिधी – शुभांगी सरोदे- पुरीगोसावी

पुणे : धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भावाच्या पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आणि जन्मलेली मुलगी भावाची नसल्याचा राग मनात धरून चुलत्यानेच १३ महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गवळेवाडी येथे घडली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शंकरेश्वर माने याला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
तामलवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंकरेश्वर माने याला आपल्या भावाच्या पत्नीचे परपुरुषासोबत

अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून जन्मलेली मुलगी ही भावाच्या रक्ताची नसून परपुरुषाची असल्याची शंका त्याच्या मनात घर करून राहिली होती. या संशयातून त्याने रागाच्या भरात १३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर आरोपीने अत्यंत अमानुषपणे चिमुकलीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरले आणि जमिनीत पुरून टाकले. तपासादरम्यान आरोपीने ही बाब पोलिसांसमोर कबूल केली असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तामलवाडी पोलिसांनी जलदगतीने तपास करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *