पुणे : अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा कांचन (अध्यक्ष – महिला बिगरशेती सहकारी पत संस्था) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महादेव तुकाराम कांचन (संस्थापक अध्यक्ष – अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन) यांनी भूषविले.

या भव्य सोहळ्यास शाळेचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब जगदाळे, शाळा सचिव अजिंक्य महादेव कांचन, ऋतुजा अजिंक्य कांचन (माजी सरपंच – उरुळी कांचन) तसेच अस्मिता अतुल बहिराट कांचन यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी धारवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना “बॉलीवूड बीट्स – सांस्कृतिक रंगत” अशी होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्य, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती पखले, डेलीस गौडर व उज्वला नेवासे यांनी प्रभावीपणे केले. सहसूत्रसंचालनाची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांनी समर्थपणे पार पाडली. यामध्ये मयुरेश बगाडे, साध्या काटम, रितू प्रसाद, हिंदवी जगताप, कृतिका साठे, अनुष्का द्वारकुंडे व श्रेया जगदाळे यांचा समावेश होता.
संपूर्ण कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणांचे नृत्यदिग्दर्शन रेवती पखले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.