पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलिस ठाण्यात ग्रामपंचायत महिला स्वच्छता कर्मचारी, महिला पोलिस पाटील, महिला दक्षता समिती सदस्या तसेच परिसरातील महिला नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान महिला दक्षता समितीच्या सदस्या स्मिता नार्टन, आळंदी म्हातोबाची येथील अंगणवाडी सेविका आशा भंडलकर तसेच कु. शुभ्रा रवि आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी उपस्थित महिलांना महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. पुणे शहर पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करणाऱ्या विश्वराज हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे यावेळी आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नाळे, पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, पैठणे, महिला अंमलदार तसेच महिला पोलीस पाटील प्रियंका भिसे (कदमवाक वस्ती), रेश्मा कांबळे (थेऊर), सोनाली शिवरकर (आळंदी म्हातोबाची) यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *