पुणे : लोणी काळभोर परिसरातील पुणे–सोलापूर रोडलगत असलेल्या हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट, बार अँड लॉजिंग येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता. १९) सकाळी सुमारे १० वाजता छापा टाकला. या कारवाईत हॉटेल व्यवस्थापक व एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक तयार करून पंचांसह कारवाई करण्यात आली. हॉटेलमधील मॅनेजर मोहन कसनु राठोड (वय ५०, रा. लोणीकाळभोर) याने पंचांसमक्ष ग्राहकाला महिलांची ‘सर्व्हिस’ उपलब्ध करून देण्यास होकार दिला. रूम भाडे व इतर रकमेची मागणी करून रूम क्रमांक २०१ मध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय २५) याच्यामार्फत कंडोम पुरविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले.

ठरल्याप्रमाणे माहिती मिळताच रेडींग पार्टीने तत्काळ रूम क्रमांक २०१ वर छापा टाकला. छाप्यात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन व कंडोम पाकिटांसह एकूण ८४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पीडित महिलांची रेस्क्यू करून सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपआयुक्त परिमंडळ ६ डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *