पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी टिळेकरवाडीत आलेले भाजपचे बुलंद आवाज, विधान परिषदेचे आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या उपस्थितीत टिळेकरवाडीचे विद्यमान सरपंच गोवर्धन सुरेश टिळेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामध्ये सामाजिक कार्यकर्ते महेश टिळेकर, उद्योजक कपिल टिळेकर, प्रतीक भुजबळ, अंकुश बाप्पू टिळेकर यांचाही समावेश होता. या प्रवेशामुळे हवेली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

यावेळी केसनंद–कोरेगावमूळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कविता पायगुडे, पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरज चौधरी, टिळेकरवाडीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र टिळेकर, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बापू टिळेकर यांच्यासह सदाशिव टिळेकर, रोहिदास टिळेकर, शामभाऊ गावडे, सुभाष टिळेकर, सुभाष लोणकर, संगीता टिळेकर, विजय टिळेकर, सोनल कोद्रे, गणेश टिळेकर, विकास जगताप, अमर टिळेकर, विकास टिळेकर, शामजी टिळेकर, चंद्रकांत टिळेकर, नितीन हगवणे, राजेंद्र चौधरी तसेच टिळेकरवाडी, नायगाव आणि पेठ कोरेगावमूळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवेली भाजपचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी केले. तर टिळेकरवाडीच्या वतीने आभार भाजप अभियंता सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षल टिळेकर यांनी मानले.