पुणे : देसाई ब्रदर्स लिमिटेड व वनराई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खडकी शिक्षण संस्था तसेच सी. के. गोयल व टीकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय, खडकी येथे विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन अद्ययावत स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने या उपक्रमांतर्गत मुला व मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा सुलभ होऊन त्यांना अधिक आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.

उद्घाटन समारंभास खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, देसाई ब्रदर्स लिमिटेडचे सीएसआर प्रमुख चंद्रकांत रावळ, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश गुजराथी, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र लेले, शिक्षकवर्ग तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त प्रकल्पांमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *