शुभांगी सरोदे- पुरीगोसावी (प्रतिनिधी)

पुणे : सातारा जिल्हा पोलिस दलातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११.४५ ते १२.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्यातील महिला अंमलदार, होमगार्ड पथकातील महिला कर्मचारी तसेच फॉरेन्सिक व्हॅनमधील महिला अधिकाऱ्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय अधिकारी

राजश्री तेरणी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे तसेच पोलीस ठाण्यातील अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *