पुणे : आपल्या भारतीय परंपरेनुसार हळदी-कुंकू हे सौभाग्य, समृद्धी आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते. या परंपरेला साजेसा सामाजिक आणि सुसंवाद वाढविणारा हळदी-कुंकू कार्यक्रम उरुळी कांचन येथे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला सभासद व खातेदार यांच्यासाठी उत्साहात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आयुष्यातील चांगल्या आठवणी, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. महिलांमधील सुसंवाद, एकोपा आणि आत्मविश्वास वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव शेअर करत आनंद व्यक्त केला.

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ महिला सभासदांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
महिलांच्या प्रगतीसाठी पतसंस्था नेहमीच कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सदर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन पतसंस्थेच्या कर्मचारी मयुरी बोडके, मृणाल कांचन आणि सोनाली वाले यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि यशस्वी ठरला.

या प्रसंगी संस्थेच्या सल्लागार अक्षदा कांचन, परिघा कांचन, शुभांगी परीट, अलका मदने तसेच अश्विनी जगताप, रुपाली थोरात आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिलांनी अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत करत लोकमंगल पतसंस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *