पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर ने सहकार क्षेत्रात नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. संस्थेच्या संस्थापक आणि आमदार सुभाष बापू देशमुख, चेअरमन गुरण्णा तेली, व्हाईस चेअरमन निर्मला कुंभार, सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर व संचालक मंडळाच्या सक्षम मार्गदर्शनाखाली संस्था ३,००० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास सक्षम झाली आहे.

संस्थेच्या विविध ‘आकर्षक ठेव योजना’ नागरिकांना सुरक्षित आर्थिक नियोजनाची संधी देतात. महिलांसाठी विशेष आवर्तक ठेव योजना असून, महिला नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी आवाहन केले.

लोकमंगल पतसंस्था, सोलापूर शाखेच्या वतीने उरुळी कांचन येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला; छाया गदादे, लता शर्मा, सुवर्णा गायकवाड, डॉ. गीतांजली खांडेकर, वसुंधरा वनारसे व सपना दंगे यांचा सन्मान संस्थेच्या सल्लागारांमार्फत करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महासुपर स्फाट न्युजच्या संपादिका सुवर्णा कांचन उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे विभागीय विस्तार अधिकारी कमलाकर पाटील, सल्लागार अक्षदा कांचन, परिघा कांचन, शुभांगी परीट, अलका मदने, तसेच शाखाधिकारी अभिजित साखरे, मनिषा देशमुख, कर्मचारी मयुरी बोडके, मृणाल कांचन, सोनाली वाले, अनिकेत जगताप आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मी माळी यांनी केले, सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित साखरे यांनी केले.
लोकमंगल पतसंस्था यासारख्या पुढाकारांमुळे सुरक्षित आर्थिक नियोजनासह महिला सक्षमीकरणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *