पुणे : मोदीनगर, उत्तर प्रदेश येथे दि. ३ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्टस अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.

कु. नेत्रा भागवत थोरात हिने युथ ४४ किलो वजनी गटात १३० किलो वजन उचलत कांस्यपदक पटकावले. तसेच कु. शुभम विजय काळभोर याने सीनियर ७१ किलो वजनी गटात २९२ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले.

या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधून सुमारे ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये लोणी काळभोर येथील दोन खेळाडूंचा समावेश होता. या दोन्ही खेळाडूंना सह्याद्री स्पोर्टस अँड फिटनेस सेंटरचे क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश विठ्ठल नगीने यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल लोणी काळभोर गावचे सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे चेअरमन हेमंत सोपानराव हाडके, तुकाराम मारुती काळभोर, रमेश यशवंत भोसले, हवेली तालुका

वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे, उपाध्यक्ष अमर गणपत गिरी, खजिनदार नरेश गणपत गिरी, तुषार ज्ञानेश्वर कुंभार, अमोल आडागळे व राजू काळभोर सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *