पुणे : मंगळवार (ता. ४) रोजी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपास पथक गस्त घालत असताना पुणे–सोलापूर रोडवरील संजय नर्सरीजवळ दोन इसम विना नंबर प्लेटच्या दुचाकींवरून संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राज बाळू घाडगे (वय २३, रा. मांजरी बु., पुणे) व किशोर संजू चाफे (वय २३, रा. मुंढवा, पुणे) अशी सांगितली.

सखोल चौकशीत सदर इसमांनी खराडी व लोणीकंद पोलिस ठाण्यातील हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १३ बीजी ३२९१), दुचाकी (क्र. एमएच
२७ बीडी ६१७१) तसेच एक मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे लोणीकंद पोलिस स्टेशन गु.र.नं. २६/२०२६, बीएनएस ३०३(२) आणि
खराडी पोलिस स्टेशन गु.र.नं. २९९/२०२५, बीएनएस ३०३(२)
असे दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना खराडी व लोणीकंद पोलिस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस उप आयुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ६, पुणे शहर), सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले (लोणी काळभोर विभाग) तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकातील पीएसआय पैठणे, पोलिस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, प्रशांत सुतार व अशोक गिरी यांनी ही कामगिरी पार पाडली.