शुभांगी सरोदे-पुरीगोसावी, प्रतिनिधी

जळगांव जिल्हा : जळगांव जिल्ह्यातून एक दुर्दैवी धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये विवाहित महिलेवर असलेल्या प्रेमाचा रक्तरंजित झाला आहे.
चोपडा तालुक्यातील एका विवाहित महिलेवर शिरपूरमध्ये प्रियकराने घरात घुसून डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळीबार करीत आत्महत्या केली आहे.

या घटनेने जळगाव जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. अनिता जगदीश पाटील ( वय ४० )आणि देवानंद सुभाष (वय ३५) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून अनिता पाटील हिचा गेल्या १२ वर्षापासून संसार चांगला चालला होता. मात्र इंस्टाग्रामच्या माध्यमांतून देवानंद धनगर यांच्याशी ओळख झाली होती. आणि या ओळखीचे रूपांतर त्यांच्यात प्रेम संबंधात झाले मात्र काही दिवसांपासून अनिता ही देवानंद धनगरला यास वेळ देत नसल्याने तो चांगलाच संतप्त
होता. त्याने शनिवारी रागाच्या भरात अकुखेडा येथील अनिताच्या घरी कोणी नसताना गेला यावेळी ही दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि अखेर देवानं गावठी बंदुकीने आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली, अनिता ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिल्याने मुलीकडून या घटनेला वाचा फुटली.
या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.