शुभांगी सरोदे-पुरीगोसावी, प्रतिनिधी
पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलात जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता डॉ. स्नेहल तावरे संचालक स्नेहवर्धन रिसर्च इंस्टिटयुट आणि स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, डॉ प्रकाश पंधारे (निवृत्त प्राचार्य) अविनाश व हळबे, सु.ल. खुटवड मराठी लेखक व पत्रकार,मिलींद शिंत्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र माने त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठा भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, कविवर्य कुसुमाग्रजांनी केवळ साहित्य निर्माण केले नाही,तर मराठी भाषेला अभिमानाची ओळख दिली.
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मराठी भाषेची उत्क्रांती, प्रचार, प्रसार याबाबत माहिती दिली. मराठी भाषा ही तंत्रज्ञानाशी कशी जोडली गेली आहे याचे विश्लेषण मांडले. तसेच मराठी भाषा ही महाराष्ट्रांपुरती मर्यादीत नसुन त्याचे विदेशात देखील शिक्षणासाठी महत्व दिले जात आहे.
मराठी भाषा ही केवळ आपली भाषा नसुन ती आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. त्याचे जतन केले पाहिजे असे देखील सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय कामात फारसी शब्दांऐवजी संस्कृत व स्थानिक मराठी शब्दांचा वापर रुजवण्यासाठी तसेच राज्यकारभारासाठी राज्यव्यवहार कोश मराठीत तयार केला आणि मराठी भाषेची ओळख करून दिली आहे.
या कार्यक्रमाला पुणे ग्रामीण विभागातील आदीं पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविता व आभार उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र माने यांनी आभार मानले.