पुणे : पत्रकारितेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रासह राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत संपूर्ण महाराष्ट्रातील १०० पेक्षा अधिक कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या संघटनेतर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकीय, व्यावसायिक, कृषी, सांस्कृतिक तसेच पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्रसह देशातील अनेक राज्यांत कार्यरत असून संघटनेचे २० हजारांहून अधिक पदाधिकारी सक्रिय आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत असून महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष रुपालीताई सावंत, राज्य सचिव मंगलताई सासवडे (शिक्रापूर, पुणे) तसेच राज्य अध्यक्ष शकील मणियार, राज्य उपाध्यक्ष रामभाऊ आवारे (निफाड) आणि राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिनेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक नलावडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या नियोजन समितीनुसार या सन्मान सोहळ्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी इतर राज्यांतूनही प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून मान्यवरांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार नामांकनासाठी तसेच अधिक माहितीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शकील मणियार (मो. ९०६०१६८६७१) व राज्य उपाध्यक्ष रामभाऊ आवारे, निफाड (मो. ८७८८५०४५१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.