पुणे. : राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार सोहळा आयोजन समिती सदस्या, गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक जिल्हा सदस्या तसेच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा समिती शिर्डी आयोजन समिती सदस्या सौ कविता पद्माकर बाविस्कर पंचवटी नाशिक यांची राष्ट्रीय नोंदणीकृत माय माऊली शिवशक्ती फाऊंडेशन च्या नासिक जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती माय माऊली शिवशक्ती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा सचिव डॉ संदीप काकड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ रेखा संदीप काकड, राष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजिनिअर साहिल काकड यांनी दिली आहे.

निवड पत्रात असे म्हटले आहे की आपण करत असलेले पत्रकारिता , सामाजिक , शैक्षणिक, कायदेशीर , वैद्यकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा ,कृषी व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आपली राष्ट्रीयकृत माय माऊली

शिवशक्ती फाउंडेशनच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.आपणास नियुक्त केलेल्या पदाची संस्थेच्या ध्येय धोरण व उद्दिष्टे यानुसार वरीष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत संस्थेचे नावलौकिक वाढविण्यासाठी यशस्वीपणे कार्य कराल तसेच संस्थेच्या ध्येय धोरणात कोठेही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी.
लोक सेवेसाठी, निसर्ग सेवेसाठी व संस्थेच्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी आपण परिश्रम घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. या निवडीबद्दल माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.