रामभाऊ आवारे, प्रतिनिधी
निफाड : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळावर ७९ वर्षानंतर प्रथमच महिला अध्यक्षा म्हणून सौ नीता ताई संजय पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे .या निवडीबद्दल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहे .
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थी श्री प्रकाश सर्जेराव पाटील, संदीप उगले ,दीपक परदेशी, राजेंद्र कराड यांनी सौ निता ताई पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी माजी विद्यार्थी सुद्धा कटिबद्ध आहे .

शाळेची प्रगती ही अतिशय उल्लेखनीय आहे आणि या संस्काराचे बीज आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे आम्ही या संस्थेमध्ये शिकुन जीवनाची सुरुवात केलेली याचा आम्हाला अभिमान आहे.असे मत माजी विद्यार्थी, पंचायत समिती सदस्य श्री प्रकाश सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले .

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाची स्थापना सन १९५३ मध्ये झाली आहे .आणि या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहेत . सौ. नीताताई यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतून आपले सारखे विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी , शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहोत त्यामुळे नक्की शाळेची प्रगती होत राहील यात कुठलीही शंका नाही असे मनोगत व्यक्त केले ताईंनी देखील संस्थेच्या अध्यक्षा म्हणून माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला आभार व्यक्त केले.
याप्रसंगी लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाणी सर, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका केदारे मॅडम , जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन निकम यांस सह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते .