रामभाऊ आवारे, प्रतिनिधी

निफाड : नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच चौथ्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनंदाताई साहेबराव पाटील यांना सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे येथे आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड येथे आयोजित चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा समारंभात कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे येथे शिवछत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आयोजन आचार्य आत्रे रंगमंच पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सुनील हिरुरकर असिस्टंट टू पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड,सुरेश पोखरकर एअर फोर्स (वायुसेना) टेक्निकल ऑफिसर

राहुल शिंदे,स्टार माझा डायरेक्टर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबतच निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर सर हे उपस्थित होते. आणि त्यांच्यासोबत उमेश बांदल, भाग्यदेव घुले ,अभिनेते प्रशांत तपस्वी ,देव झुंबरे, जगदीश संधानशिव,

अभिनेत्री काजल शिंदे हे सर्व पाहुणे उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांच्या हस्ते संपूर्ण मान्यवरांचा आणि पुरस्कारार्थी यांचा सत्कार करण्यात आला व यांना पुरस्कार देण्यात आला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त पुरस्कार वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक गिरीश सुदास राजुरकर तसेच उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे आणि खजिनदार सिद्धार्थ शिंदे हे उपस्थित होते. सोबतच स्वराज्य फिल्म ची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *