प्रतिनिधी, रामभाऊ आवारे

निफाड : महाशिवरात्रीच्या पावन-पर्वावरती श्री श्री १०८ महंत स्वामी जणेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन हे ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भारत माता आश्रम बोकडदरे म्हसोबा माथा तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे.

या ठिकाणी असलेल्या मौनगिरी गो शाळेच्या मदतीसाठी ही संगीतमय अशी शिवमहापुराण कथा कथाकार ह भ प अनंतदास महाराज वहाडणे धारणगाव तालुका कोपरगाव यांच्याकडून संपन्न होत आहे.

त्यानिमित्ताने दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ वाजता अभिषेक काकड आरती सकाळी ९ ते दुपारी २ यज्ञ पारायण सायंकाळी चार ते पाच या वेळेला हरिपाठ व सायंकाळी पाच ते रात्री आठ संगीतमय शिव महापुराण कथा होणार असून शिव पंचायत रुद्र स्वाहाकार यज्ञ होणार आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी १० ते १२ श्री स्वामी आदित्यनंद सरस्वती महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे तरी समस्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारत माता आश्रम बोकडदरे यांचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत जनेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *