पुणे : उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालय (CBSE, संलग्नता क्रमांक 1131458) येथे 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘इंटिग्रेटेड एक्झिबिशन फॉर होलेस्टिक एज्युकेशन’ ही संकल्पना यंदाच्या कार्यक्रमाची मुख्य थीम होती. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व एकात्मिक शिक्षणावर भर देत हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांनी शाळेच्या संचालिका नयॉन सुरेश कांचन व अध्यक्षा डॉ. नुपूर सुरेश कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली. प्रमुख पाहुण्या म्हणून MIT School of Education and Research येथील प्रा. डॉ. दिव्या नायर उपस्थित होत्या.

विज्ञान विषयातील विविध प्रकल्प, वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण व प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थिनींनी आपले कौशल्य प्रभावीपणे मांडले.

मनोरंजक विज्ञान दालन, गणितीय संकल्पना स्पष्ट करणारे दालन, हिंदी व मराठी भाषेचे महत्त्व तसेच सण-परंपरांचे दर्शन घडविणारे प्रदर्शन यामुळे संपूर्ण शाळा ज्ञानमय वातावरणाने उजळून निघाली होती. आर्ट अँड क्राफ्ट विभागातील चिमुकल्यांच्या कलाकृतींनीही उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

विद्यार्थिनींनी प्रत्येक प्रकल्पाबाबत आत्मविश्वासाने व उत्साहाने माहिती सादर केली. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकासाचा प्रत्यय उपस्थितांना आला. प्रदर्शनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका संयोजिता मुगळे तसेच इतर विषयांच्या शिक्षिकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *