पुणे, : युवराज हिरामण काकडे यांची हवेली तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर समाजाभिमुख उपक्रम राबवत आपल्या कार्याची सुरुवात केली. थेऊर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे (Senior Citizen Card) वितरण करण्यात आले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले हे ओळखपत्र मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बोलताना काकडे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.” पुढील काळात आरोग्य शिबिरे, प्रलंबित पेन्शन प्रकरणे तसेच ग्रामविकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत नव्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
दरम्यान, आरोग्यदूत म्हणूनही कार्यरत असलेल्या काकडे यांनी महिनाभरापूर्वी आळंदी, कुंजीरवाडी, थेऊर, कोलवडी, मांजरी आणि आव्हाळवाडी या गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांत ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
थेऊर व कुंजीरवाडी येथील ओळखपत्र वाटप पूर्ण झाले असून, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी येथील कार्ड वाटप लवकरच जिल्हा परिषद सदस्य कोमल संदेश आव्हाळे आणि पंचायत समिती सदस्य सुषमाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती युवराज काकडे यांनी दिली.