शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी

पुणे : उत्तर कोरेगांव तालुक्यांतील वाठार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी नुकताच पदभार घेतला असून सध्या उत्तर कोरेगांव गावच्या वाठार परिसरांत घरफोड्या, इतर चोऱ्या तसेच अवैध धंदेवाल्यांचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत.

होळी-धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर वाठार पोलिस पेट्रोलिंग करीत असताना वाठार ते बिलकुले रस्त्यावर एक संशयित विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकलवरून फिरताना आढळला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर मोटरसायकल बाबत माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केल्याचे दिसून आले. अखेर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली पोलिसांना दिली.

अधिक चौकशी केली असता माझ्या घरी आणखी दोन मोटरसायकली असल्याचेही सांगितले आहे. त्याच्याकडे कोणताही पुरावा नसल्याने मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाली.

दत्तात्रय धनसिंग पवार (वय ३३) रा. बिचुकले ता. कोरेगांव जि. सातारा असे आरोपींचे नाव आहे. त्यांचेवर वाठार पोलिस ठाण्यात रजिस्टर नंबर ५३/२०२५६ मुंबई पोलिस अधिनियम कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींकडून सुमारे एकूण दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पो.हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, म.पो.ना. गौरी कदम, पो.कॉ. प्रशांत गोरे, विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे यांनी केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पो.हवा. जितेंद्र शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *