पुणे येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच अद्याप पावेतो अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ पत्रकार, वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक व प्रसारक ,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच वनसगाव तालुका निफाड येथील रामभाऊ विठ्ठलराव आवारे यांना पत्रकारिता ,सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे येथील स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ या पुरस्कार वितरण सोहळ्यात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने पत्रकारिता व अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीश राजूरकर , मंगेश कसवे, सिद्धांत शिंदे, राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, अण्णा बिडवे , हिरा घुले, निर्मला गायकवाड , कुलदीप परांडे, दत्ताभाऊ पाटील, संग्राम दादा गावंडे युवा सरपंच धानोरे, बाबा गोलदान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दीपक लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, जयेश जोजारे पुणे जिल्हाध्यक्ष, विशाल सस्ते, सुनील ठोंबरे, विजय संभाजी, सुधीर भाऊ मुंगसे, साईल बाबा श्रीकांत शिंदे , विकास डोळस, उदय गायकवाड, चंद्रकांत भाऊ वाळवे, जगदीश खापटे, निलेश बानगुडे, निलेश रामेकर, सचिन गायकवाड, आकाश शिंदे, राजेंद्र राऊत,विजय पाटकर अभिनेता,, मुद्दल नाना गोडबोले अभिनेता, प्रशांत तपस्वी अभिनेता, भूषण कडू अभिनेता, अनिल नगरकर अभिनेता, काजल शिंदे अभिनेता, बाळासाहेब बांगर अभिनेता, बाळासाहेब बोराटे दिग्दर्शक निर्माता, काळूराम ढोबळे दिग्दर्शक निर्माता, अमित तायडे पार्श्वगायक, सागर ननावरे दिग्दर्शक निर्माता आदी़ंच्या उपस्थितीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *