पुणे: विंचूर (ता. निफाड) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. रयत शिक्षण संस्था, सातारा येथील जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करण्यात आले. स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जगदीश काका जेऊघाले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भारत स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकाने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सामूहिक कवायत संचलन घेण्यात आले. या संचलनात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साक्षरतेची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमास सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले, विंचूर गावचे सरपंच सचिन दरेकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, जेऊघाले ताई, मोरे, पी. के. जेऊघाले, नानाभाऊ गाडे, दिनकर चव्हाण, मिरा दरेकर, सोनाली कापडणीस, स्नेहल साळी, स्वाती धात्रक, हरीष कांगणे, विनायक जेऊघाले, शंकरराव दरेकर, फिरोज मोमीन, सतीश कुसळकर, डॉ. सौरभ शेंगणे, सतीश सोनवणे, बागुल सर, ज्ञानेश्वर सोनवणे, अशोक दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदाम माळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विंचूर व पंचक्रोशीतील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाइफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.