शुभांगी सरोदे – पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी

परभणी : कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय तक्रार समितीची आढावा बैठक आज येथे पार पडली. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व विश्वासार्ह कार्यपरिसर मिळावा तसेच त्यांच्या तक्रारींचे तातडीने व न्याय्य निवारण व्हावे, हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, प्रशासकीय प्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणांसोबत सखोल चर्चा करण्यात आली. महिलांना कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवता यावा यासाठी संवेदनशील व जबाबदार सहकार्याची संस्कृती निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, सिव्हिल सर्जन नागेश लखमवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रेशमी खांडेकर, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, जिल्हा विधी सेवा सल्लागार डी. जी. सूर्यवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *