पुणे : साने संगीत क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वार्षिक शैक्षणिक व सांस्कृतिक सहल अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राम संस्कृती उद्यान, पाषाण (पुणे), जिजामाता उद्यान, पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड) तसेच बनकर उद्यान, हडपसर या ठिकाणांना भेट देत निसर्ग, इतिहास व संस्कृतीचा मनसोक्त आनंद घेतला.

सकाळी उत्साहात सहलीची सुरुवात झाली. ग्राम संस्कृती उद्यानात ग्रामीण जीवनशैली, पारंपरिक कला, वेशभूषा व लोकसंस्कृती यांची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना झाली. जिजामाता उद्यानात विविध प्राणी, पक्षी व जैवविविधतेचे निरीक्षण करताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व आनंदाचे वातावरण दिसून आले. बनकर उद्यानात निसर्गरम्य परिसरात खेळ, गप्पा आणि समूह उपक्रमांमुळे सहलीचा आनंद द्विगुणित झाला.

या सहलीत वैष्णवी साळुंखे, ऋतुजा आवळे, रेखा साने, सिद्धलिंग शिंदे, राणी शिंदे, पूजा कोटी, शिवराज साने, यशराज साळुंखे, श्रीशा काकडे, श्रेयस हत्तीकट, गणेश साळुंखे, वेदांत गायकवाड, रुद्र जाधव, आयुष हत्तीकट, ओंकार कुंजीर, सृष्टी भोसले, शिवाजी इंगळे, सुरेखा बेहरा, वैशाली साळुंखे, ऋग्वेद आवळे, सुयश घनवट, आर्या शिंदे, अजय शिंदे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

तसेच बीचकुले सर, अर्चना हत्ती, धम्मदीप गायकवाड आणि बेहरा जाधव यांनी सहलीचे योग्य नियोजन व मार्गदर्शन केले. सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना, निरीक्षणशक्ती आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत झाली.

साने संगीत क्लासेसच्या या उपक्रमाचे पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले. अशीच उपक्रमशीलता भविष्यातही सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *