पुणे: हडपसर प्रभाग क्रमांक ४१ हडपसर–हांडेवाडी–महमदवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार पक्ष)च्या सचिव व संघटक सौ. दिपाली शैलेश कवडे यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. हांडेवाडी येथील प्राथमिक शाळेत लहान मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच स्वच्छता कर्मचारी महिलांना हॅन्ड ग्लोज व मास्कचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. दिपाली कवडे होत्या. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ कोणत्याही नेत्याच्या किंवा महापुरुषांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचणे आवश्यक आहे. त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करणे हीच खरी मानवतेची ओळख आहे.” होळकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनाही शिक्षणविषयक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विजय दगडे म्हणाले, “दीपालीताई अनेक वर्षांपासून या भागात कार्यरत आहेत. त्यांनी कधीही दिखावा न करता केलेले काम प्रेरणादायी आहे. सामाजिक कार्याची ही परंपरा त्यांच्या हातून अशीच सुरू राहो, ही प्रार्थना.” अविनाश तात्या काळे यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला विजय दगडे, अविनाश तात्या काळे, ऋषिकेश दोमाले (हडपसर कार्याध्यक्ष), अमोल हजारे, जयश्री ताई आदमाने, राणी काकडे, शैलेश कवडे, ओम कवडे, अजित दरेकर, गणेश कांबळे, विनायक शिंदे, दामोदर पंथ (स्वच्छता अधिकारी), भोसले यांसह शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकीची जाण जपणारा हा उपक्रम स्थानिकांतून कौतुकास्पद ठरला.
