पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इनोसन्ट टाइम्स संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला पुणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. एकूण १२८० निबंध स्पर्धेसाठी प्राप्त झाले. इयत्ता पाचवी ते दहावी आणि खुला गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्यात, विचारशक्तीत व सामाजिक जाणिवेत वाढ होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
या स्पर्धेसाठी “डिजिटल इंडिया आणि शिक्षण”, “मी मुख्याध्यापक झालो/झाले तर!”, तर खुल्या गटासाठी “भविष्यातील शाळा” आणि “शालेय शिक्षण आणि माझा दृष्टिकोन” हे प्रेरणादायी विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने व समजुतीने निबंध सादर केल्याने परीक्षण करणे परीक्षकांसाठी आव्हानात्मक ठरले. परीक्षक म्हणून सौ. सुरेखा संजीव मोरे आणि श्री. संजय दिनकर कांबळे यांनी कार्यभार सांभाळला.
गट क्र. १ (इयत्ता पाचवी ते दहावी) प्रथम : इशिका योगेश दोडमणी
द्वितीय : दिव्या नंदकिशोर गोडगे
तृतीय : हर्षदा किरण नवले
उत्तेजनार्थ : आर्या नंदकुमार ढोके, ईश्वरी भगवान तायडे
गट क्र. २ (खुला गट)
प्रथम : श्री. रवींद्र महिपती शिंदे
द्वितीय : सौ. जयश्री किरण नवले
तृतीय : सौ. अवंती राहुल नाईक
उत्तेजनार्थ : श्रीमती रेखा प्रल्हाद आबनावे, सौ. प्रिती दबडे
विजेत्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि कृषिमंत्री श्री. दत्तामामा भरणे यांनी अभिनंदन पत्र पाठवून कौतुक केले. संस्थापक डॉ. अंकिता संघवी यांनीही विजेत्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन श्री. धनंजय मदने यांनी केले. बक्षीस वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्व विजेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
