पुणे : येथील स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना, महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने हा भव्य पुरस्कार वितरण समारंभ १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, दैनिक महा सुपरफास्टच्या संपादिका सुवर्णा कांचन (उरळी कांचन, पुणे) तसेच वारकरी मंचचे स्टार प्रचारक व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे (निफाड) यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

खासदार अमोल कोल्हे, आमदार पै. महेशदादा लांडगे, उपमहापौर निर्मलाताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार असून, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नामवंत गायक, अभिनेते-अभिनेत्री, आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाबाबतची माहिती मुख्य आयोजक प्रा. गिरीष राजूरकर, मंगेश कसबे, सिद्धांत शिंदे आणि राजेंद्र ठोंबरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *