पुणे : येवला तालुक्यातील कातरणी येथे दोन दिवस चालणाऱ्या भवानी माता यात्रा उत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक भवानी माता मंदिराचा जिर्णोद्धार करून रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात फुलांच्या माळांनी सुबक सजावट करण्यात आली असून, भवानी मातेला दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.

यात्रेनिमित्त आज सायंकाळी भवानी मातेची रथ मिरवणूक तसेच तकदराव महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार, दिनांक ३ रोजी रात्री मा. भिमा–नामा यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दिनांक ४ रोजी सकाळी ८.३० वाजता कातरणी ग्रामपंचायत, विकास सोसायटी, दत्त जयंती पौर्णिमा उत्सव समिती तसेच उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आणि मा. सरपंच कैलास नाना व संपत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ ब्लड बँक, नाशिक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कातरणीतील ग्रामस्थ व युवक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *