पुणे : बी एस एफ बहुद्देशीय संस्था व समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात नाशिक नगरीत चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती मध्ये पार पडणार आहे.

सामाजिक, कला, राजकीय, शिक्षण, पर्यावरण, पत्रकारिता, उद्योग, क्रीडा, व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. या पुरस्कारासाठी प्रस्ताव स्वीकारणे सुरु असून आपला प्रस्ताव ९४२०६२१९९४ या नंबर वर पाठवावा.महाराष्ट्रातील केवळ ७० लोकांना महाराष्ट्र नायक या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर सुरु असतात. यावेळी संस्थेच्या वतीने वृद्धाश्रम बांधण्याचा संकल्प आहे. लोकांच्या सन्मानातून वृद्धाश्रम उभं व्हावं या निमित्ताने व उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली.

हा पुरस्कार सोहळा आगळावेगळा व दिमाखदार पद्धतीने व्हावा त्याचबरोबर आलेल्या सर्व पुरस्कारार्थींचा यथोचित मानसन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा आयोजन समिती याप्रमाणे

वरीष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे निफाड, पत्रकार मुकुंद आव्हाड सारोळे थडी, जेष्ठ पत्रकार डॉ.शाम जाधव नाशिक, महिला पत्रकार व उत्कृष्ट निवेदिका अश्विनी पुरी नाशिक रोड, पत्रकार विष्णू गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सौ राजनंदिनी अहिरे नाशिक रोड, गिरजा प्रतिष्ठानच्या सौ वैशाली सोनवणे सटाणा, कवयित्री व उत्कृष्ट निवेदिका कु.अश्विनी सांगळे येवला, शिक्षिका सौ प्रीती म्हसदे नाशिक, शंकरराव कन्हेरकर शिंगणापूर, संजय पाटील पत्रकार संजय बच्छाव , डॉ. रावसाहेब घोडेराव ,योगिता डांगळे (अकोला), शिक्षक दादाराव सुखदाने ,पत्रकार रोशन गव्हाणे नाशिक,शिक्षक सोपान वाघमारे आदींचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *